Tuesday 27 December 2016

ओढ़

मन हसते ... गुणगुणते
जागेपणी हे स्वप्न कुणाचे पाहते ???
तो यईल माझ्या सामोरी
नजर बावरी लाली गाली 
भेट आपली एक क्षणाची
वाटे मला जन्मो जन्मीची
ओढ त्याला तुझ्या प्रितीची
...........@Durga (सर्व हक्क राखीव )

तुझ्यात जीव रंगला

स्वप्नातला निशिगंध
अवचित फुलला
कळले ना काही मला ....
भाव मनी.. कोणता रंगला ?
देह भान हरपले ...
श्वास .. स्वासात रंगला
गाली आली लाली
जीव तुझ्यात गुंतला ....
@ दुर्गा
सर्व हक्क राखीव

भाव अंतरीचे

उन्हात चांदणे हसते
मन स्वप्नात रंगते
अंतरीचे भाव उमले
तेव्हा सूरही जागले 
परी शब्द मुकेच जाहले
इंद्रधनूच्या रंग रंगले
चित्र तुझेच साकारले
मन मंदिरी तुझीच प्रिती
दे ना हात हाती ...
@दुर्गा (Copy Right सर्व हक्क राखीव )

अशी कशी ओढ

कितीही नाही म्हंटल तरी.
मन  तुझ्या कडेच वळत...
नको जाऊ म्हंटल तरी...
पावले तुझ्या कडेच निघतात..
अशी कशी ओढ
कळत नाही...
मन माझ....माझच.काही ऐकत नाही...
कोण तू...कुठून आलास ??
ओळखत नाही तुला
तरी जीव का गुंततो तुझ्यात...???
💞@दुर्गा copyright

मिलन स्वप्न

माझ्या मनातलं गुपित
जाणावे कधीतरी ??
 माझ्या अंतरीचे बोल
बोलावे कुणीतरी ???

मुके ओठ , डोळे बोलके
प्रित मधुर गीत गाते
गाली अबोली सजावी
हे मिलनाचे स्वप्न
व्हावे आज खरे
@ Durga

Friday 16 December 2016

सुविचार

प्रेम  तेव्हाच करा जेव्हा ह्रदयाची  भाषा वाचायला शिकाल, 
कारण.... प्रत्येकाच्या चेहर्यावरून त्याचा,,,, प्रामाणिकपणा समजत नाही..
.......#Durga
----------------
खूप माणसं भेटतात ... आपलं... आपलं म्हणणारी 
पण .... फारच कमी असतात .... ते आपलपण टिकवणारी
..........#Durga
---------------

Friday 30 September 2016

हरवले कुठे

आपलेपनाचे बोल सारे
हरवले कुठे सारे •••
भास सारे सभोवति
सत्य कुठे शोधि मना •••
गुंतलेला जीव कसा सोडवु
बंधनातुनी••••
हरवली साऊली माझी
या खोटया जगात •••
पाऊलेही थबकली
या वाकडया वाटेत
साद का ऐकु येईना
आज तुझ्या मायेची
आठवांनी पापनीही जड झाली
कसे आवरू वेडया मना
सांगेल का कुणी मला ????
•••••@दुर्गा

आस

चांदण्याचे आंगण माझे
तू रिमझिम बरसणारा श्रावण
स्वपन माझे सुंदर
जीवनात येईल कधी ?
मला तुझ्या सोबत प्रेम नगरीत
स्वप्नातील एक घर बनवायचे आहे
फुल मिळतीलच अस नाही काट्यासोबत हि
सुख सोढेल तुज सवे
तुझ्या डोळ्यांनी मला हे जग बघायचे आहे
तुझ्याच कुशीत मला विसावा घ्याचा
हि आहे वेड्या जीवाची वेडी आशा
रोज साज्वेली सजवते नाव दिशा ...
.......


@दुर्गा

Monday 19 September 2016

मी असेन तुज पाशी

मी कोण आहे हे कळलं
कि स्वतासाठी जगावसे वाटतं
आनंद कोणामध्ये शोधण्याऐवजी
स्वत: साठी हसावंसं वाटतं
जखमा भरतात व्रण उरतात
आयुष्यभर मनाला यातना देतात
त्या वेदनेमध्ये तू कायम भेटत राहशील
खरे प्रेम सर्वांना पाहिजे असतं
निरागस निष्पाप काही न मागणारं
पण मिळालं तर कोणी ओळखत नाही
आणि मग असे प्रेम मिळत नाही
जेव्हा माझी किंमत कळेल
तेव्हा तुला ते सांगायला मी नसेन
पण माझ्या शब्दांमधून कवितांमधून
मी कायम तुझ्यापाशी असेन
   Durga

Sunday 18 September 2016

अनुत्तरित प्रश्न

सर्व हक्क राखीव
#####
जीवनाची खडतर वाटेवर
साथ आपलीच माणस सोडतात
अश्रु शिवाय सोबती मग कोणी•••
ओजळीच्या फुलांची अपेक्षा
काट्यानी झोळी भरते
वेळही फिरते जेव्हा
संकटाची वादळ पाहुन•••
जग चालत आपल्या गतीन
रंग आयुष्याचे कुणा सापडतात
कुणाचे हरवुन जातात•••
वेड मन काही ऐकत नाही
आस लावुन बसते
त्याला ना समझे
ही दुनिया असे लयभारी
एका हाताने देते सुख
अन दहा हताने वापस घेते
हा सारा खेळ कुणाचा?????
नशीबाचा, वेळेचा, नियतीचा कि आपल्याच माणासाचा ????
अनुत्तरीत प्रश्न •••••• @दुर्गा
(C) Copy Reserved

Saturday 17 September 2016

अखेर चे शब्द

अखेरचे काही शब्द् ...फ़क्त तुझ्यासाठी .......
अखेरची आठवण घे माझी
यापुढे मनात तुझ्या
माझ येणे जाणे असणार नाही...
यापुढे माझ्या आठवणींचं
चांदणं तुझ्या मनात बरसणार नाही.....
यापुढे कधीही माझ्या आठवणींचा पाऊस
तुझ्या मनाच्या अंगणात बेधुंद बरसनार नाही....!
माझा हळवेपना मीठीतला
प्रेमळ आपलेपणा जसा स्वीकारला होता
तसच माझ मरणही स्विकारुन घे...!
हे अखेरचे माझे काही अश्रू,
फक्त तुझ्यासाठी... पण यापुढे
माझ्या आसवांच्या धारा वाहणार नाहीत...
काही करु नको उग रडू नको
होती एक वेडी वेड तिच प्रेम
वाटल तर आठवनीत ठेव नाही तर
अस्थि सोबत वाहून जाऊ दे
या जन्मी तरी सुख प्रेम नाही भेटल
कदाचित पुढच्या जन्मी तरी
थोड़ प्रेम थोड़ सुख मिळेल म्हणुन मला जाऊ दे ।
अखेरचे काही शब्द ,फक्त तुझ्यासाठी...
यापुढे मी कधी तुझी कुशी मागणार नाही .........!
कारण अखेरची शांत कुस
माय माउली धरणी माता मला कुशीत सामावून घेईल ।।।
(C) Copy Reserved
@ दुर्गा वाड़ीकर

Life is math

आयुष्याचे गणित माझ्या ....2014 मराठी कविता App वरील माझी कविता
जीवनाच् गणित मला कळले नाही
माझ्या दुःखाची बेरीज नाही गुणाकार होत गेले
सुख आयुष्यातुन वजा होत गेल
जेव्हा भागाकार केला तेव्हा
बाकी फक्त मी आणि माझे दुःख उरले
वेदने चे वर्तुळ वाढत गेले
अश्रुचे चौकोन मला हिनवु लागले
नात्यांच्या त्रिकोनात मात्र
मी एकटी पडले
माझ्या दुःखाचे भागीदार कुणी नाही
प्रेमाची तर सुरुवातच नाही
जगन्यासाठी ची सूत्रे सर्व बेकार ठरली
एकाही नात्याच्या सुत्राने सुखाच् उत्तर नाही दिल
जीवनाच्या वाटेवरील गणिताची बाकी काढली
तर बाकी फक्त
मरण आल
बाकी फक्त मरण आल
(C) RIGHT RESERVED..
@दुर्गा वाडीकर

Thursday 8 September 2016

फुल प्रीतीचे

सुगंधी श्वास घेता
मन बेधुंदीत होई
हृदयी उमले फुल नकळत प्रितीचे
अन् स्पंदने मंदावत जाई
दिवस हे प्रेमाचे
अलगद सरुन जाती
अबोली आठवण
मात्र हृदयात कोरुन जाई
मनपाखरास आवडे
सहवास तो प्रेमळ
नयनास न कळे जो भाव
तो ह्रदयाचा ठाव घेई
प्रित ही का जगा वेगळी
समजुन ना कोणी घेई
प्रेम ना करी विचार
आपल्याच धुंदीत ते
जीवन गाणे गात जाई
(C) copyright@दुर्गा

Thursday 1 September 2016

सौउली प्रीतीची

रखरखते ऊन असो
किंवा ढगांची साउली असो
काटे तुझ्या वाटेवरले
आज मला वेचु दे
दुःख कधी परि अनोळख्या वनवरती
सुखाचे चांदणे भेटती
त्याच चांदण्यात
तुला आज माझ्यात वसवु दे
कळी तू माझ्या मनीची
फुलुंन ये एकदा तरी
रुसुन लटके लाजुन जरा
गाली खळी उमटू दे
सांजवेळीची ओली हिरवळ
हळवी जशी जरा मला भिजु दे
तुझे नि माझे जग स्वप्नापरी
तरी तुझेच स्वपन मला बघु दे
बिलगुनी स्वप्नात
तुझ्या प्रेमात मज चिंब भिजू दे
सुख हे सात जन्म माझ्या वर बरसू दे .
...(C) Copyright @Durga Wadikar


चाहुल

तुझी चाहूल जरी आली कि
काळीज धडधडते
तू दूर असलास तरी जवळच जाणवतो
तू दूरदेशी तरी माझ्या 
मनाच्या अंगनात असते वेगळीच हुरहूर
मेघ नाहीत या नभी तरी
माझ्या डोळ्यात तुझ्याच आठवणीचा पूर
मी लटकेच रुसवे तू हसुनी मिठीत घावे
प्रीतीच्या रात झुल्यावर प्रेमाचे गीत गावे
सुख दुखाच्या वादळातून जपले मी गीत तुझे
मनाच्या कोपर्यात लपविले किती हे काहूर
मिलनाची ओढ वाढे
ओठी शब्द विरून जाती
झाली आता खूप तुझी मनमर्जी
ये सर्व पाश सोडूनी
घायाळ हरणी तुझी
निघून जाण्या आधी ......
......(C).Copyright @Durga Wadikar

Tuesday 30 August 2016

प्रेम ... भातुकलीचा खेळ

माझ्या प्रेमाला आज पंख फुटले
मनाचे पाखरू झेप घेउणी चालले
भावनाचे उंच झोके
स्वप्न त्यावरी गोड गोजिरे
माझी न मी राहिले
लाजून बावरी का झाले ?
साउली हि परकी झाली
शब्द हि फितूर जाहले
घेते त्याच्याच कवेत विसावा
हे स्वप्न आज मी पाहिले
खळी गाली उमटली
मी लाजून बेभान झाले
दोन मनांचे मिलन हे तर
ना भातुकलीचा खेळ हो
.............................. @Durga 

Monday 29 August 2016

सुखी कोण ???

आपण नेहेमी समजत असतो कि आपले नातेवाईक , मित्र ,सहकारी , आजूबाजूचे लोक हे जास्त सुखी आहेत आपल्यापेक्षा, पण प्रत्यक्षात काही वेगळाच असतं. "भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली आहे. 
प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने दु:खं आहे आणि सुख ही आहे , त्यांच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत 
" जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
विचारी मना तूच शोधोनी पाहे …!!!

प्रेम हे....

यालाच प्रेम म्हणतात
तो तिला म्हणाला “सोनू आज होली चल सोबत खेलु”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा ”
तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक
नाही केला तर?”
ती म्हणाली ” आईला औषध घ्याच आहे”
बाबा ला पण वेलेवर जेवण पाहिजे"
तो “काय हे सोनू माझ्या साठी वेळच नाही तुझ्याकडे
आज ऑफिस ला सुट्टी आहे ग ये ना "
ती " अरे घर आवरायच राहिले "
तो "जाऊ दे मी चाललो"
“तुझ्यामुळे
गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघ तुझ्या नादामधे
भाजी झाली तिखट”
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू
आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस
सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून
दमला भागला दिवस
संपला तरी अबोला संपेना सुरवात
नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन
ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून
अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?”
आणि तो विरघळला।
“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स
ओढल्यास सांग”
“माझी सिगरेट जळताना तुझ
जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जी जाळण
आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेलते
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेलतेस
तुला नाही का वाटत कधी माझ्या रंगात रंगावे
अणि माझ्या स्वप्नी जगात जावस?”
“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
मी हाथ धरून जेव्हा या घरी आलेहोते, मी-तू पण तेव्हाच गळलं
तुझ्या प्रेमाच्या रंगात तर
दररोज नाहुन जाते
तेव्हा माझ सर्व तुझ्याच रंगाच्या जगात तेव्हाच
नाही का विरघळलं?”
तो तिला कुशीत घेत
"माझी बाई तू ;
खरच सोनू वेडी माझी बाई ।।।"
♥♥♥

दुर्गा

Friday 26 August 2016

साद विरली

करपली आस जीवनाची
वारा गातो नवी गाणी
श्रावणाने बहरेल धरती
सुकले फूल मनीचे
नवी कळी उमलेल का ????

गळाली आसवांची कित्येक पाने
मोती मिसळले मातीत
ना सावली साथ ..... ना हाती हात .....
@Durga


Thursday 25 August 2016

कुणीतरी

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधीबदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो
कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात
पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....
आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं
कारण प्रत्येकालाच गरज असते एकासाथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगातरंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी
म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
...........

अर्थ शब्द

बोलन आमच्या दोघातील ••••
अगदी पाहण्यासारखा असते
शब्द माझ्या ओठात बंद आणि अर्थ
त्याच्या डोळ्यात दाटलेला स्पष्ट दिसतो...
हेच तर खर प्रेम असत••••नाही का •••• 
दुर्गा ••••


प्रेम...चंद्र

स्वतालाच ♥ विसरून स्वतालाच
प्रेम♥ म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम ♥अस गाण असत
मोती काय??? चांदण काय???
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर♥ असताना
कोणी चांदण ♥ शोधत का???

...................... Durga


Sunday 21 August 2016

सोन्याचा उबरा

सर्व हक्क कवियत्री कडे राखीव
*****
मोगरा मोहरला अंगणी
आला समोर अवचित साजन
बांधावा ओवुन गजरा वेणीत•••
तुझ्या स्पर्शान जीव झाला बावरा
झिंग लाडीक तनुवर चढली•••
तुझ्या बाहुत अडकला मन भोवरा•••
हिरवा आषाढ आलया फुलुन
डोंगर दरीत घुमतो •••मदन पारवा •••
सख्या पाण्यात लाविल मी अंगारा
जरा सबुरीन घ्याव ••• अवचित थांबाव
नव्या नवतीचा संसार माझा
कसा फुलून आलाय बघा ,
चा्ंदण्याच छत डोईवरी
माझ्या घराला सोन्याचा उंबरा
मोगरा मोहरला अंगणी ••••
@दुर्गा

स्वप्न...

सर्व हक्क राखीव
 ->  -> ->  ->  ->  -> 
हे घरट मखमली ... सपनामधले वाटे
आनंदाचा झुळूक इथे रोज झुळझुळते
प्रीतीच्या छायेखाली.... मायेची वेळ बेहरे
मन पाखरू होऊन ....आभाळ पांघरे
नजर ना लागो कुणाची.... हे सदा फुलत राहो
ना कधी नजर लागेल...., हे सदा फुलत राहील
नंदनवन हे आपुल्या दोघांचे.... स्वर्गाहून सुंदर
दिस मावळात पाखरू घरट्यात
विसावे गहिऱ्या एकांतात
तू माझ्यात मी तुझ्यात विरघळने
चांद रातीच्या कवडश्यात 
@दुर्गा

मन हे चिंब

सर्व हक्क राखीव
#####
चिंब मनी बसले कुणी तरी रुसुन
भिजलेला मेघ अल्लड आठवते पुन्हा
शोधते वार्यात •••शोधते पाण्यात
पाऊस तुझा  माझा स्वरातुन भिजलेला
सजेल ऋतु•• बहरेल प्रेम,
गंधित ह्या लता वेली •••झेलतील टपोरे थेंब

होईल वेडापीसा •••पाऊस प्रितीचा पहीला
पाहु पाना फुलात, मिलनाच्या 💕 थेंबखुणा
धुंद झाला गारवा, घुमे सुर सनई मनात
कळ्याची व्हावी फुले •••फुलांचा व्हावा झुला
मनात  न सांगता ••• तु उमजुन घ्याव इशार्यात
@दुर्गा

Friday 19 August 2016

आई

आई तुझी अंगाई
स्वर्ग सुखाची साऊली
तुझ्या पदराची झोळी
मऊ झोका मखमली 
@दुर्गा

Wednesday 17 August 2016

भेट आपली



तू  आणि मी,
अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला, एकांताची साथ  असावी...
गुलमोहराचा बहर,
आणि तिथेच आपली भेट  असावी
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट असावी...
...............  Durga