Tuesday 30 August 2016

प्रेम ... भातुकलीचा खेळ

माझ्या प्रेमाला आज पंख फुटले
मनाचे पाखरू झेप घेउणी चालले
भावनाचे उंच झोके
स्वप्न त्यावरी गोड गोजिरे
माझी न मी राहिले
लाजून बावरी का झाले ?
साउली हि परकी झाली
शब्द हि फितूर जाहले
घेते त्याच्याच कवेत विसावा
हे स्वप्न आज मी पाहिले
खळी गाली उमटली
मी लाजून बेभान झाले
दोन मनांचे मिलन हे तर
ना भातुकलीचा खेळ हो
.............................. @Durga 

Monday 29 August 2016

सुखी कोण ???

आपण नेहेमी समजत असतो कि आपले नातेवाईक , मित्र ,सहकारी , आजूबाजूचे लोक हे जास्त सुखी आहेत आपल्यापेक्षा, पण प्रत्यक्षात काही वेगळाच असतं. "भला उसकी कमीज मेरी कमीज से सफेद कैसी ?" ह्या प्रश्नाचं उत्तर शोधतच आपली जिंदगी चालली आहे. 
प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीने दु:खं आहे आणि सुख ही आहे , त्यांच्या नशीबावर आपलं नशीब घासत बसून उपयोग नाही, आपलं सुख कशात आहे हे शोधा आणि ते वाढवा कारण समर्थ सांगून गेलेत 
" जगी सर्व सुखी असा कोण आहे ?
विचारी मना तूच शोधोनी पाहे …!!!

प्रेम हे....

यालाच प्रेम म्हणतात
तो तिला म्हणाला “सोनू आज होली चल सोबत खेलु”
ती म्हणाली “पोळि करपेल, थाम्ब जरा ”
तो म्हणाला “काय बिघडेल स्वयंपाक
नाही केला तर?”
ती म्हणाली ” आईला औषध घ्याच आहे”
बाबा ला पण वेलेवर जेवण पाहिजे"
तो “काय हे सोनू माझ्या साठी वेळच नाही तुझ्याकडे
आज ऑफिस ला सुट्टी आहे ग ये ना "
ती " अरे घर आवरायच राहिले "
तो "जाऊ दे मी चाललो"
“तुझ्यामुळे
गेली माझी चांगली सुट्टी फुकट”
“बघ तुझ्या नादामधे
भाजी झाली तिखट”
आता मात्र तो हिरमुसला, केली थोडी धुसफूस
एइकू
आली त्याला सुद्धा माजघरातून मुसमुस
सिगरेट पेटवत, एकटाच तो निघून गेला चिडून
डोळे भरून बघत राहिली,
ती त्याला खिड़की आडून
दमला भागला दिवस
संपला तरी अबोला संपेना सुरवात
नक्की करावी कुठून दोघांनाही कळेना
नीट असलेली चादर त्याने उगीच पुन्हा नीट केली
अमृतांजन
ची बाटली तिच्या उशाजवळ ठेवून दिली।
तिनेच शेवटी धीर करून
अबोला संपवला
“रागावलास न माझ्यावर?”
आणि तो विरघळला।
“थोडासा…” त्याने सुद्धा कबूल केला आपला राग
ती म्हणाली “बाहेर जावून किती सिगरेट्स
ओढल्यास सांग”
“माझी सिगरेट जळताना तुझ
जळणं आठवल
छोट्या मोठ्या गोष्टींसाठी जी जाळण
आठवल
अपेक्षांच ओझ तू किती सहज पेलते
सगळ्यांच सुख दुःख तळहातावर झेलतेस
तुला नाही का वाटत कधी माझ्या रंगात रंगावे
अणि माझ्या स्वप्नी जगात जावस?”
“बोललास हेच पुरे झाल…एकच फ़क्त विसरलास…
मी हाथ धरून जेव्हा या घरी आलेहोते, मी-तू पण तेव्हाच गळलं
तुझ्या प्रेमाच्या रंगात तर
दररोज नाहुन जाते
तेव्हा माझ सर्व तुझ्याच रंगाच्या जगात तेव्हाच
नाही का विरघळलं?”
तो तिला कुशीत घेत
"माझी बाई तू ;
खरच सोनू वेडी माझी बाई ।।।"
♥♥♥

दुर्गा

Friday 26 August 2016

साद विरली

करपली आस जीवनाची
वारा गातो नवी गाणी
श्रावणाने बहरेल धरती
सुकले फूल मनीचे
नवी कळी उमलेल का ????

गळाली आसवांची कित्येक पाने
मोती मिसळले मातीत
ना सावली साथ ..... ना हाती हात .....
@Durga


Thursday 25 August 2016

कुणीतरी

कोणाच्या तरी येण्याने आयुष्यच कधी कधीबदलून जातं
आपलं सारं जगच त्यांच्याभोवती फिरू लागतं
जिवंत राहणं आणि एक एक क्षण जगणं
यातला फरक समजू लागतो
नाही नाही म्हणता आपणही
प्रेमात पडू लागतो
कधी हसणं विसरून गेलो तर
ते हसायला शिकवतात
जीवन हे खऱ्या अर्थाने
जगायला शिकवतात
पण एक दिवस जेव्हा ते दूर निघून जातात....
आपलं आयुष्यच अर्थशून्य वाटू लागतं
त्यांच्या गोड आठवणींमधे वेडं मन झुरू लागतं
कारण प्रत्येकालाच गरज असते एकासाथीदाराची,
प्रत्येक क्षणाला प्रीतीच्या रंगातरंगवण्यासाठी
त्याच्या गोड गुलाबी स्वप्नात हरवण्यासाठी
म्हणूनच ........
असेल जर कोणी असं खास तुमच्याजवळ
जाऊ देऊ नका त्यांना कधी दूर
एकदा जवळ घेऊन म्हणून तर बघा
...........

अर्थ शब्द

बोलन आमच्या दोघातील ••••
अगदी पाहण्यासारखा असते
शब्द माझ्या ओठात बंद आणि अर्थ
त्याच्या डोळ्यात दाटलेला स्पष्ट दिसतो...
हेच तर खर प्रेम असत••••नाही का •••• 
दुर्गा ••••


प्रेम...चंद्र

स्वतालाच ♥ विसरून स्वतालाच
प्रेम♥ म्हणजे देण असत
आयुष्याला सुरात बांधेल
प्रेम ♥अस गाण असत
मोती काय??? चांदण काय???
प्रेम कधी कोणी मोजत का?
चंद्र समोर♥ असताना
कोणी चांदण ♥ शोधत का???

...................... Durga


Sunday 21 August 2016

सोन्याचा उबरा

सर्व हक्क कवियत्री कडे राखीव
*****
मोगरा मोहरला अंगणी
आला समोर अवचित साजन
बांधावा ओवुन गजरा वेणीत•••
तुझ्या स्पर्शान जीव झाला बावरा
झिंग लाडीक तनुवर चढली•••
तुझ्या बाहुत अडकला मन भोवरा•••
हिरवा आषाढ आलया फुलुन
डोंगर दरीत घुमतो •••मदन पारवा •••
सख्या पाण्यात लाविल मी अंगारा
जरा सबुरीन घ्याव ••• अवचित थांबाव
नव्या नवतीचा संसार माझा
कसा फुलून आलाय बघा ,
चा्ंदण्याच छत डोईवरी
माझ्या घराला सोन्याचा उंबरा
मोगरा मोहरला अंगणी ••••
@दुर्गा

स्वप्न...

सर्व हक्क राखीव
 ->  -> ->  ->  ->  -> 
हे घरट मखमली ... सपनामधले वाटे
आनंदाचा झुळूक इथे रोज झुळझुळते
प्रीतीच्या छायेखाली.... मायेची वेळ बेहरे
मन पाखरू होऊन ....आभाळ पांघरे
नजर ना लागो कुणाची.... हे सदा फुलत राहो
ना कधी नजर लागेल...., हे सदा फुलत राहील
नंदनवन हे आपुल्या दोघांचे.... स्वर्गाहून सुंदर
दिस मावळात पाखरू घरट्यात
विसावे गहिऱ्या एकांतात
तू माझ्यात मी तुझ्यात विरघळने
चांद रातीच्या कवडश्यात 
@दुर्गा

मन हे चिंब

सर्व हक्क राखीव
#####
चिंब मनी बसले कुणी तरी रुसुन
भिजलेला मेघ अल्लड आठवते पुन्हा
शोधते वार्यात •••शोधते पाण्यात
पाऊस तुझा  माझा स्वरातुन भिजलेला
सजेल ऋतु•• बहरेल प्रेम,
गंधित ह्या लता वेली •••झेलतील टपोरे थेंब

होईल वेडापीसा •••पाऊस प्रितीचा पहीला
पाहु पाना फुलात, मिलनाच्या 💕 थेंबखुणा
धुंद झाला गारवा, घुमे सुर सनई मनात
कळ्याची व्हावी फुले •••फुलांचा व्हावा झुला
मनात  न सांगता ••• तु उमजुन घ्याव इशार्यात
@दुर्गा

Friday 19 August 2016

आई

आई तुझी अंगाई
स्वर्ग सुखाची साऊली
तुझ्या पदराची झोळी
मऊ झोका मखमली 
@दुर्गा

Wednesday 17 August 2016

भेट आपली



तू  आणि मी,
अशी फक्त कल्पना असावी
सोनेरी त्या क्षणाला, एकांताची साथ  असावी...
गुलमोहराचा बहर,
आणि तिथेच आपली भेट  असावी
जसे एखाद्या पाखराची,
गोड ड्रीम डेट असावी...
...............  Durga