Tuesday 23 May 2017

साद

हे मना तुला कुणाची साद आली का ??
भोवतालची किमया जाणवली का ?
वाऱ्याची थंड झुळूक
झऱ्याचे झर झर झरने 
ऐकलेस का ????
दाही दिशांचे सूर
आभाळाची मुकी माया
अनुभवलीस का ???
लाटांची भांडणे
किनाऱ्याचे प्रेम
स्पर्शलेस का ????
फुलांची गंधगाथा
भ्रमरांचे अबोल भाव
कधी टिपलेस का ????
विधात्या किरणांची
लपविलेली रात्र
कधी शोधलीस का ??
सुख नको शोधू
जीवनाशी जोड नाते
भेटेल स्वर्ग तुला इथे
भेटेल स्वर्ग इथे
धीर जरा धरशील का ???
@दुर्गा

Wednesday 3 May 2017

येड मन

वेड मन माझं ... कधी तुला कळेल का ...?
माझ्या मनाचे गुपित ... तुलाही उमजेल का ...?
स्वप्नात पाहते मी तुला ... तू तुही स्वप्नी पाहशील का ... ?
मुके शब्द बोलले ... सुरात ते रंगतील का ... ?
खेळ हा क्षणाचा ... घाव उरी का लागला
अश्रू माझ्या नयनीचे ... तुझ्या डोळ्या येतील का ... ?
माझी मी ना राहिले ... गुज मनाचे सांगते
मी तुझी च साजणी ... हे सत्य तुला उमगेलं का .... ?
@दुर्गा

भेट तुझी माझी

बोलण खूप झालं
आता डोळ्याचे भाव जाणून घे
आठवणीत खूप रमले
प्रत्येक्षात आता समोर ये
तो स्पर्श , ची चाहुल
ते तुझं सोबत चालणं
चालता चालता थोडं थांबणं
बोलता बोलता हातात हात देणं
घाई घाई घराकडे जाण
पुन्हा परतून
मिठीत घेणं ...
उद्याच्या भेटीचं हळूच सांगणं ...
खूप झालं आता बोलणं
मनाचे बंध रेशमाचे धागे
रेशमी बंधात बांधु
तू माझा आणि मी फक्त तुझी
साथ सात जन्मी देऊ
@Durga

व्यथा

आपल्या व्यथा स्वत:ला जेवढ्या तीव्र वाटतात,
तेवढ्याच त्या इतरांना मामुली वाटतात.
हेच एकटेपण, पोरकेपण,
केव्हा केव्हा हे पोरकेपण
आपण लावून घेतो.
जीवनात असच असतं असं म्हणतो.
स्वत:ची समजुत स्वत:च घालतो.
पण कुठेतरी ठिणगी पेटते
आणि मग सगळं खाक होतं.
असं हे पेटणं म्हणजे कापराचं पेटणं.
मला स्वत:ला जळायला आवडतं. कारण
ज्याला आच आहे जळून जाण्याची
ताकद आहे तोच माणूस आहे. पण
त्याच वेळेला मला हे असं कापराचं
जळणं आवडत नाही,
ह्याचं कारण मागं काही उरत नाही.
तसं जळणं नको,
राखेच्या रुपात का होईना मागं काही
तरी राहायला हव

आठवण

न सांगताच दुःख मागून येते
सुखाची वाट काट्याने भरते
हसूनी रडावे की रडुनी हसावे
या जीवनाचे रंग किती पाहावे ??
फुलांचा गंध वाऱ्यासह येतो
नव्या सुंगंधात मनास छळतो
स्पर्श होता मखमली तुझा
जीव कासावीस होतो
रोज सांजवेळ तुलाच शोधते
तुझ्या आठवणींची शाल आता पांघरते
@दुर्गा

प्रेम

रोजचाच चंद्र का भासावा नवा
हात तुझा हाती हवा
रोजचेच सर्व सारे
रोजचेच चंद्र तारे 
हि किमया स्पर्शाची तुझ्या
मोहरूनी अंग सारे
हलते पापणी
धडधडते काळीज
स्वप्नांच्या वाटेत
भेट तुझी माझी
क्षणभर मिटावे डोळे
विरघळून जावा चंद्र
चांदणी लाजून
व्हावी धुंद
@दुर्गा

मी तुझी

कळीला फुल भेटते
मनाला मन
लपून छपून प्रेम येते
वेड जीवाला लावते
जिवात जीव गुंततो
नकळत सगळे होते
बावरते तन
आतुरते मन
मोहरते ती प्रित
पंख स्वप्नाचे लेऊनि
घेई भरारी आकाशी
क्षणोक्षणी भास नवे
जवळ दूर सगळीकडे
तूच तू ....
शोधूनि तुला
मी माझी हरवते
@दुर्गा

जख्म

कितीही व्याकुळले मन
तरी भविष्य काही उमगेना

आनंदाचे गीत ओठी माझ्या
पण जीवनाचे सूर जुळेना 
नाती- गोती नावाचीच
मेळ कुठे बसेना
भावनांचा बाजार केला
अश्रूंना ना किनारा भेटला

माझ्याच जखमांना
मीच कुरवाळत जाते
विस्कटलेल्या जीवनात
हळुवार रंग भरते
@ दुर्गा

अबोल दुःख

फुल फुलावे भावनांचे
पण भाव कुणी ना जाणले
मंद गंध प्रेमाचा दरवळे सभोवती
काळीज कोवळे करपून जाती
केली ना कुणी वाट वाकडी
दिसली ना कुणा माझ्या मनाची स्थिती
खुडली स्वप्न वेलीवरची
अश्रूं ना मावे नयना आली भरती
गेले सरून सरणावरती
दुःख अबोल ओठांवरती
@दुर्गा

हिरवा चुडा

यमाचीही झुकवेल मान
असा हा ... सुवासणीचा हिरवा चुडा
हिरवा चुडा ... पिवळी हळद
सौभाग्याचे द्योतक
स्वप्न चंदेरी ... सुख मनोहारी
सजवीत असे ... रोज नयनी
दोन घरांची लाज राखते
मान सन्मान फक्त मागते
नसती कुठली आशा
निस्वार्थ सेवा तीच करते
अमानुष अत्याचार तिच्यावर करती
रूप चण्डिका घ्यावेच लागती ...
हिरवा चुडा हाती तलवार
दुर्गा रूप शोभते छान...
@दुर्गा