Thursday 21 September 2017

अश्रू

अश्रू डोळ्यातले अजूनही ओलेच आहे
सुखाची साउली ना सोबती
ओठ मुकेमुकेच आहेत
संपेल का ही रात्र काळवंडलेली 
उजडला ना प्रकाश .... सगळे धुके धुकेच दाटे
मनात चिरल्या गेले घाव जखमांचे
तरी पावलांचे चालणे चालूच आहे
साथ कुणाची मागावी सर्व भासती मृगजळ
तरी वेड्या मनाचे ... हुरहुरणे बाकीचं आहे
@दुर्गा

कधीतरी

कधीतरी हरवून जावे ... या अनोळखी वाटेवर
स्वतः चेच बोट धरून ... चालत राहावे अनोळखी वाटेवर
माझेच शब्द मी ऐकावे ... या अनोळखी वाटेवर
स्वर गीत प्रितीचे .. गुंफावे ... या अनोळखी वाटेवर
भेटेल कुणीतरी .... या अनोळखी वाटेवर
रंगवेल तो चित्र माझे ... या अनोळखी वाऱ्यावर
स्पर्शेल तो वारा या ... अनोळख्या स्वप्नांना
शोधीन मला तो कधीतरी ... या अनोळख्या वाटेवर
@दुर्गा

Sunday 3 September 2017

महि माय

मह्या मायीच जीन ... लय कामात गेलं
संसाराचं चाक तिन ... लय नेटान हाकल
फाटक्या साडीला ठिगळ हातभर
त्याची सल ना तिच्या ओठावर
दिस डोक्यावर येई ... माय रानात जाई
सरपण करी गोळा ... रातच्या चुल्हीला
काटा रुततो पायात ... रगतान भिजे माती
होई उशीर जायाले ... घरी लेकरुं ठेवले
भारा डोई वर जड .. तरी चालते अनवाणी
घाम टप टपा गळे ... धाप उरी लय लागे
मही माय लय न्यारी ... कस सांगू तिचं जिन
तिच्या उपकारच ऋण ... ह्या जन्मी नाही फिटणे
@दुर्गा वाडीकर

नशीब

उसवला धागा नात्याचा
राहिली ना कुठे जागा
वेळ कशी हि आली
काळीज चिरून गेली
कसे कुठून आले
बाण दुःखाचे मनी
जाते मावळून आशा
डोळे आभाळ दाटते
गेले विरून सुख
जीव गेला ह्यो फाटून
किती सावरू नशीब
किती लावावी ठिगळ
@Durga