Monday 30 January 2017

खेळ प्रीतीचा

अश्याच कोणत्यातरी वळणावर
रंगेल खेळ जीवनाचा
दोन जीवांचा बसेल मेल
सात जन्माचा
गांधळेल रात्र
दरवळे रातराणीचा गंध
चंद्र हसेल
चांदणी हि लाजेल
लवेल नक्षत्रांची वेल
पहाटच्या दंवात
विरेल रात सारी
सूट म्हणेल तरी
सुटेना मिठी तुझी
@दुर्गा (सर्व हक्क राखीव )


परतुन भेट

अवचित कधी सख्या साजना
समोर माझ्या येशील का ?
इंद्रधनुचे सात रंग
अंगणी माझ्या आणशील का ?
पावसाची पहिली सर होऊनि
चिंब मला करशील का ??
मोरपिसारा जीव माझा
कळी सारखा फुलवशील का ??
सांज सोनेरी आज केशरी
लाज गाली लाली आली
भान नसे मजला माझे
चाहुलीत येणं खूप झालं प्रत्येक्षात येशील का ??
@ दुर्गा (सर्व हक्क राखीव )

सुख दुःख..जीवन

विरले अंधाराचे जाळे ... प्रकाश पसरे
ऋतू बदले .... फुल फुलवे हा कोण असे सूत्रधार ?
काळ्या मातीत अंकुरे बीज
पक्षी आकाश घेई झेप 
एक थेंब पावसाचा मोत्या हुन ही अनमोल
सप्त सुरांतून कोण छेडतो निसर्गाची तार ?
कधी सुख कधी दुःख
जीवन भरती - ओहोटी
कधी रखरखे ऊन ... कधी गुलाबी थंडी
चिऊ काऊच्या कुशीत विसावे हि सावली
सोन सकाळ सजते
वासुदेवाच्या येण्याने
रोज कष्टते राबते संसारी रमतो हा जीव
तुझ्या मायेच्या पंखात येई जीवनाला बहर
@ दुर्गा (सर्व हक्क राखीव )


मनाचे घर

माझी वाट रखरखलेली
अंतरात हुरहूर दाटलेली
फिरते का अशी दूर दूर ?
तुझ्याच प्रेमात मी चूर 
अडखळते उंबऱ्यात का पाऊल ?
विसरते सर्व
माझे नाव तुझ्या ओठी
हळहळते ओठावर का हे सूर ?
माझ्याच मन घरात
लावली मी सांजवात
मन का थरथरते ज्योती सह देह मंदिरात ?
तुझेच अस्तिव माझ्या स्पर्शास दरवळेल
सुटला हा मंद वारा
धुंद होऊनी जाईल मन
टपटपेल माझं आयुष्य फक्त तुझ्या अंगणात !!!
@ दुर्गा (सर्व हक्क राखीव )


Friday 20 January 2017

जिंदगाणी

आपलंच प्रत्येक स्वप्न
पूर्ण होईलच असं नाही
खूप प्रेम करणारे पण 

आपल्याला सोडून जातात
प्रेमाच्या वाटा 
विश्वासघाताने वेगवेगळ्या होतात
कधी आपलं मन
इवल्याश्या कवडशाला तरसते
तर कधी हेच मन ... बेधुंद पावसात
चिंब भिजते 

तरी जिंदगानी ची तहान तृप्त होत नाही
कधी एक थेंब अश्रू
तर कधी ओठावर हसू
हीच आपली जिंदगानी
@ दुर्गा वाडीकर

Thursday 19 January 2017

कठपुतली...हे जीवन

माझी वाट जरा खडतर आहे
वाटेवर चालतांना उन्हाने पाय भाजतील
सोबत चालायच असेल तर चल
नुसते नाते आहेत सोबत ....
पण कुणाची सावली ही नाही 
तुला यायचं असेल तर चल ....

कुणासाठी मी माझी वाट नाही बदलू शकत
तुला माझ्या साठी बदलता आलं तर बघ ...
इथं कुणी कुणासाठी वाट मोकळी नाही करत
अडथळे मात्र करतात ...
मला वाटेतून दूर करून तू स्वत:ला सावरू शकशील का ??
सावरता आले तर चल .....

हेच जीवन आहे ....
ह्या जीवनात काही स्वप्न आहेत काही आशा आहेत
हीच स्वप्न आणि आशा ...
माणसाला जीवन भर मदाऱ्या सारख्या खेळ खेळवतात ...
आणि आपण .... त्याच्या हातातील कठपुतली
जस नियतीने नाचवले तस नाचतो ...
@दुर्गा

Tuesday 17 January 2017

नात तुझ नी माझ

त्याच नी माझं नातं जरा वेगळ असावं
कोवल्या उन्हात जस चांदण शिम्पावं..
मुक्याने बोलाव.... शब्दांनी हसावं
डोळ्यात प्रीत रंगावी 
नभात इंद्रधनु फुलाव...
गारव्या च्या थंडीत
मिठीत त्याच्या हरवुन जावं
माझं सुख त्याला सम्जाव
त्याच दुःख जरा जाणून घ्यावं
रडत रडत त्यान कुशीत शिरावं
मोठं होउन मग मी सांत्वन करावं
त्याच नी माझं नातं जरा वेगळ असावं
कोवल्या उन्हात जस चांदण शिम्पावं.
#@Durga

तुझीच मी....

आयुष्यभर तुझ्या सोबत मीच असेन. 
तु रडताना तुला हसवणारी मीच असेन. 
तुझे अश्रु पुसणारी पण मीच असेन.
तु वाटेवर चालताना वाट पण मीच असेन. 
वाटेत चुकला तरी वाट दाखवणारी पण मीच असेन.
तु शेतावर काम करताना दुपारी तुझ्यासाठी कांदा भाकर घेऊन येणारी मीच असेन.
तुला घाम आला म्हणुन पदराने घाम पुसणारी पण मीच असेन.
नदी ओलांडताना तुझा हात धरणारी पण मीच असेन.
गुढीपाडव्याला तुझ्या सोबत नऊवारी नेसुन गुढी उभारणारी पण मीच असेन.
माँल मध्ये जीन्स टाँप घालून फिरायला जाताना पण मीच असेन.
तु हात धरलास म्हणुन लाजणारी पण मीच असेन.
तुझ्या सोबत पिझ्झा खाताना पण मीच असेन.
तुझे फोटो चांगले आले तर ते काढणारी पण मीच असेन.
तू मला घरी सोडताना डोळ्यात अश्रु आणणारी पण मीच असेन.
तु रात्री झोपताना जिच्या विचारात झोपशील ती पण मीच असेन.
तुझ्या स्वप्नात आलेली राणी पण मीच असेन.
सकाळी हळुच तुझ्या कानात Good Morning बोलुन तुला उठवणारी पण मीच असेन.
तु कविता करताना तुझी कविता पण मीच असेन.
संकटाच्या वेळी तुझ्या संकटा समोर उभी असलेली मीच असेन.
मंद वाऱ्‍याची झुळुक जेव्हा तुला स्पर्श करेल त्या स्पर्शात पण मीच असेन.
तुझ्या प्रत्येक आंनदात तुझ्या सोबत मी असेनच तर दुःखात सोबत पण मीच असेन.
आणि तुला प्रेम करणारी फक्त मीच असेन.
तुझ्या जीवनाची सोबती व शेवट पर्यंत मीच सोबत असेन.
आणि ती फक्त मीच असेन...
💝दुर्गा

अंधार दाटला

थकले डोळे ... भिंतहि खचते
नक्षत्र डोळ्यांमधले आज मला आठवते
कधी ना मिळाली संध्या ती मधुर
माझ्या नशिबी फक्त रखरखते ऊन
नियतीचे ढग फाटके ,,,,
स्वप्नाचे आभाळ हे घसरत गेलेले
हिरवी झाड तोडली कोणी ??
चिऊची घरटी होती तिथे ...
आटले डोळ्यातील पाणी
ओंजळ माझी झाली रिकामी
घाबरला अंधार माझ्या अंधाराला बघून
हलकेच पाहते मी ... रात्रीत डोकावून
@दुर्गा (सर्व हक्क राखीव )