Sunday 3 September 2017

महि माय

मह्या मायीच जीन ... लय कामात गेलं
संसाराचं चाक तिन ... लय नेटान हाकल
फाटक्या साडीला ठिगळ हातभर
त्याची सल ना तिच्या ओठावर
दिस डोक्यावर येई ... माय रानात जाई
सरपण करी गोळा ... रातच्या चुल्हीला
काटा रुततो पायात ... रगतान भिजे माती
होई उशीर जायाले ... घरी लेकरुं ठेवले
भारा डोई वर जड .. तरी चालते अनवाणी
घाम टप टपा गळे ... धाप उरी लय लागे
मही माय लय न्यारी ... कस सांगू तिचं जिन
तिच्या उपकारच ऋण ... ह्या जन्मी नाही फिटणे
@दुर्गा वाडीकर

No comments:

Post a Comment